Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना भवन पुढील 3 दिवस राहणार बंद, कारण...

Webdunia
मंगळवार, 23 जून 2020 (19:15 IST)
मुंबई कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दादर परिसरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिसरातील शिवसेना भवन पुढील काही दिवसांसाठी खबरदारी म्हणून बंद करण्यात आले आहे.
लॉकडाउनच्या परिस्थितीत शिवसैनिकांकडून गरजू आणि गरिबांना मदत पुरवली जात आहे. त्यामुळे शेकडो शिवसैनिक सध्या मदतकार्याचे काम करत आहे. अनेक शिवसैनिकांची शिवसेना भवनावर ये जा सुरू असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिवसेना भवन पुढील 3 दिवस बंद राहणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शिवसेना मुख्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सेनेकडून देण्यात आली आहे.दरम्यान,  मुंबईत दररोज हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याचं खापर प्रशासनावर फोडलं जात आहे. मात्र, या परिस्थितीला मुंबईकरच जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
20 मार्चपासून ते 21 जूनपर्यंत मुंबई पोलिसांनी 8950 मुंबईकरांवर नियम न पाळल्याप्रकरणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. यात सर्वांत जास्त प्रमाण उत्तर मुंबई, मध्य मुंबई आणि पश्चिम मुंबईमध्ये आहे. मुंबईकरांनी लॉकडाऊन आणि अनलॉकचे सर्व नियम मोडले आहेत.गेल्या 48 तासांत तब्बल 262 मुंबईकरांनी अनलॉकचे नियम मोडले आहेत. मास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत 66, मध्य मुंबई 471, पूर्व मुंबई 149, पश्चिम मुंबई 435 तर उत्तर मुंबई 353 जणांवर कारवाई केली आहे. अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 92 मुंबईकरांना मुंबई पोलिसांनी खाक्या दाखवला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

लाडकी बहीण योजना बंद करा’, संजय राऊत फडणवीस सरकारवर का भडकले?

LIVE: रायगड जिल्ह्यात खाजगी बसला अपघात

वैवाहिक वादामुळे भिवंडीतील महिलेने तीन मुलींसह केली आत्महत्या

'जर अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत परत यावे', उद्धव गटाच्या नेत्याने दिली ऑफर

रायगडमध्ये बसला भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी

पुढील लेख