Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

दुकानदारांनो, नोटिस सत्र सुरू; तातडीने हे काम करा

market open
, शुक्रवार, 13 मे 2022 (08:15 IST)
राज्यभरातील दुकानदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, राज्य सरकारने आता दुकानदारांना नोटिस बजावण्याचे सत्र सुरू केले आहे. त्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे दुकानाचे नाव असलेल्या पाट्या. राज्यात आता दुकानांच्या पाट्या मराठीतच असणे बंधनकारक आहे, त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.
 
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू करण्यात आला आहे. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले होते. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. तसेच, त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती. त्यानुसार, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी,  मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत असणे बंधनकारक आहे.
 
बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती सरकारने मंजूर केली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मुंबईतील काही दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्याच्या अन्य भागातही नोटिस सत्र सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ज्या दुकानदारांनी पाट्या अन्य भाषेत लावले आहेत त्यांना आता तातडीने पाट्या बदलाव्या लागणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मला कुणी समजून घेत नाही म्हणत, 14 वर्षीय मुलीनं केली गळफास घेऊन आत्महत्या