Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

SSC-HSC Exam : इयत्ता दहावी - बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळा पत्रक जाहीर

exam
, मंगळवार, 20 जून 2023 (12:09 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या पुरवणी लेखी परीक्षेचे वेळा पत्रक जाहीर केले असून लेखी पुरवणी परीक्षा जुलै -ऑगस्ट 2023 मध्ये घेतली जाणार आहे. 
 
इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 8 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा मंगळवार 18 जूलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार. तर इयत्ता 10 वी लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023  या कालावधीत होणार असून सविस्तर वेळा पत्रक महाराष्ट्र बोर्डाच्या संकेत स्थळावर दिले आहे.

संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी देण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. परीक्षेपूर्वी छापील वेळापत्रक माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे देण्यात येतील. विद्यार्थी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर पत्रक पाहू शकतात. 
 
इयत्ता 10 वी ची प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 रोजी ते 5 ऑगस्ट 2023 पर्यंत आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी यांची नोंद घेण्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.छापील वेळापत्रकांवरून परीक्षेच्या तारखांची खात्री करण्याचे विद्यार्थाना सूचना दिली आहे
 
Edited by - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bhopal : तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून तरुणाला कुत्र्यासारखं भुंकायला लावले