Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लहान मुलांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारचा केंद्राकडे आग्रही

State government urges Center to vaccinate children लहान मुलांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारचा केंद्राकडे आग्रही Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
, मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:31 IST)
राज्यात कोरोना विषाणूची संख्या आता कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारचा केंद्राकडे आग्रह असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे लसीकरण खूप अत्यंत असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.
११ ते २० वयोगट हा साधारणपणे पाचवी ते बारावी पर्यंतचा वयोगट आहे. राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लशीचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण करण्याचं नियोजन टोपेंनी केलं आहे. आता कॉलेज सुद्धा ओपन करण्यात आलेले आहेत. परंतु कॉलेज किंवा शाळेमध्ये विद्यार्थ्यी गेले असता तो संसर्ग हळूहळू पसरतो. त्याचा गुणधर्म सुद्धा तोच आहे.
गेल्या २० दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे आपण लहान मुलांना सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हॅक्सिन आणि लसीकरण केलं पाहीजे. असं मत टाक्स फोर्सने मांडलं आहे. महाराष्ट्राच्या वतीने आता आग्रही राहू की लवकरात लवकर मुलांचं लसीकरण करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले , या सरकारने समाजाची माफी मागावी " दरेकर