Publish Date: Fri, 29 Apr 2022 (09:04 IST)
Updated Date: Fri, 29 Apr 2022 (09:06 IST)
"पंतप्रधान पदावरील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांची चांगली वागणूक सामान्यांना अपेक्षित आहे. पण सध्या ते सदासर्वकाळ राजकारण्यासारखे वागत आहेत. त्यांच्या वागण्यामुळे मी नाराज नव्हे तर हैराण झाले आहे," अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेलवरून मोदींनी घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
"ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे. त्याबाबत मी लोकसभेत व त्यांना वैयक्तिक भेटल्यानंतरही सांगितलं आहे," असं सुळे यांनी म्हटलं.