Marathi Biodata Maker

सुप्रिया ताई सांगतात, देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा आहे

Webdunia
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (21:59 IST)
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीसांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा आहे, अशा आशयाचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या परभणी  बोलत होत्या.
 
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो मुळात देशातील चर्चेचा मुद्दाच नाही. तो फक्त देवेंद्र फडणवीसांना राजकारणासाठी कदाचित सोयीचा असेल. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या लागत नसतील, म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, अशीही शक्यता आहे.”
 
कारण बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पक्षामध्ये बाकीचे लोक हलायला जागा देत नसतील. त्यामुळे ते पवारांचं नाव घेऊन दररोज काहीतरी नवीन वावड्या उठवत आहेत, अशी शक्यता आहे. कारण या राज्याची सहा-सहा खाती त्यांच्याकडे आहेत. गृहमंत्री आणि उर्जामंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत. ज्या व्यक्तीकडे अर्थमंत्रीपद आहे आणि त्याच्यावर अर्थसंकल्पाची जबाबदारी आहे. अशा व्यक्तीला अशी कंड्या पिकवायला (गॉसिप) वेळ कसा मिळतो? त्यामुळे मला आपल्या राज्याची चिंता वाटायला लागली आहे,” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही

हा देश ताज्या फिफा क्रमवारीत नंबर 1 बनला

LIVE: महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

दक्षिण आफ्रिका अ संघाने भारताचा 73 धावांनी पराभव करून व्हाईटवॉश टाळला

डोनाल्ड ट्रम्प जोहरान ममदानीला भेटतील

पुढील लेख
Show comments