Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, सरकारला बदनाम करण्यासाठी विविध सोशल मीडिया साईटवर ८० हजार फेक अकाऊंट उघडली

Webdunia
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (17:19 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिस आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी विविध सोशल मीडिया साईटवर ८० हजार फेक अकाऊंट उघडण्यात आल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. याबाबत मुंबई सायबर सेल पुढील तपास करत असून Information Technology Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
आयुक्त परमबीर सिंह यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई सायबर सेल कामाला लागला असून त्यांनी काही हजारो फेक अकाऊंट्सची माहिती गोळा केली आहे. ही अकाऊंट्स इटली, जपान, पोलंड, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स चालवली जात होती. या देशांमधून या अकाऊंटवर पोस्ट पडत होत्या. सिंह म्हणाले की, बहुतेक अकाऊंट्सवरुन परकीय भाषेत पोस्ट अपलोड झालेल्या आहेत. त्यांनी #justiceforsushant #sushantsinghrajput and #SSR वापरले होते. आम्ही आणखी काही अकाऊंट्सचा तपास करत आहोत. 
 
“मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी आणि आमच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी ही ट्रोलिंग करण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे त्यावेळी ८४ पोलीस शहीद झाले होते. ६ हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. तरिही पोलिसांचे खच्चीकरण केले गेले. मुंबई पोलीस कमकुवत असल्याची एक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही या प्रकरणात गांभीर्याने तपास सुरु केला असून जे दोषी आढळतील त्यांच्यावर Information Technology Act कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.”, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट जारी

साबरकांठा जिल्ह्यात दुर्दैवी अपघात सहा जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी

भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला,फटाके आणि लाऊडस्पीकरवर बंदी

पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी एनआयए 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार, काय आहे हे

नागपुरात जोरदार पावसासह गारपीटामुळे जनजीवन विस्कळीत यलो अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments