Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला
, बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (10:08 IST)
उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. एलटीटी - करमळी आणि सावंतवाडी, पनवेल-करमळी या दरम्यान गाड्या धावणार आहेत. 
 
लोकमान्य टिळक टर्मिनस करमळी, पनवेल-करमळी आणि एलटीटी- सावंतवाडी दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - करमळी विशेष गाड्यांच्या २० फेऱ्या होणार आहेत. ०१०४७ ही रेल्वे ३ एप्रिल ते ५ जून दरम्यानदर शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता सुटणार असून करमाळीला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवाशांसाठी ०१०४८ ही रेल्वे ५ एप्रिल ते ७ जून दरम्यान दर रविवारी सकाळी ११ वाजता सुटणार असून एलटीटी रात्री १२.२० वाजता येणार आहे. 
 
या रेल्वेला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुर, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविंम या स्थानकात थांबा दिला आहे. पनवेल-करमळी रेल्वेच्या २० फेऱ्या होणार आहे. ०१०४९ रेल्वे ४ एप्रिल ते ६ जून दरम्यान दर शनिवारी रात्री ९ वाजता निघणार असुन करमळीला  दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचणार आहे. 
 
परतीच्या प्रवाशांसाठी ०१०५० ही रेल्वे ४ एप्रिल ते ६ जून दरम्यान दर शनिवारी सकाळी १०.४० वाजता  सुटणार असून पनवेलला रात्री ८.१५ वाजता येणार आहे. या ट्रेनला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी स्थानकात थांबा दिला आहे. 
एलटीटी-करमळी ट्रेनच्या १८ फेऱ्या होणार आहेत. 
 
०१०४५ रेल्वे १० एप्रिल ते ५ जून दरम्यानदर शुक्रवारी रात्री १.१० वाजता सुटणार असून करमळीला दुपारी १२.२० वाजता पोहोचणार आहे. परतीकरिता ०१०४६ ही गाडी १० एप्रिल ते ५ जून दरम्यान दर शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता सुटणार असून एलटीटी रात्री १२.२० वाजता येणार आहे. 
 
या रेल्वेला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम स्थानकात थांबा असणार आहे. याशिवाय एलटीटी-सावंतवाडी ट्रेनच्या २० फेऱ्या होणार आहेत. ०१०३७ ही गाडी ६ एप्रिल ते ८ जून दरम्यान दर सोमवारी रात्री १.१० वाजता सुटणार असून सावंतवाडीला दुपारी १२.३० वाजता पोहोचणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ