suvichar
✕

दोन दिवसांमध्ये बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढणार

Webdunia
सोमवार, 6 डिसेंबर 2021 (08:14 IST)
अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव ओसरला असल्याने कोकणासह राज्यात आता सर्वत्र कोरडे हवामान होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे.
 
सध्या किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असून, अंशत: ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे कमाल तापमान सध्या सरासरीच्या तुलनेत घटलेले असले तरी ते दोन दिवसांत पूर्ववत होण्याचा अंदाज आहे.  अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर बाष्प जमिनीकडे आल्याने राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण होते. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही भागांत या स्थितीमुळे जोरदार पाऊस झाला.  मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे तेथील रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील ढगाळ वातावरणही एक-दोन दिवसांत दूर होऊन सर्वत्र आकाश निरभ्र होण्याची शक्यता आहे. कोरडय़ा हवामानामुळे सध्या मराठवाडा आणि विदर्भात दिवसाचे कमाल तापमान सरासरीजवळ आले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ते अद्यापही सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी कमी आहे. त्यामुळे या भागात दिवसा हवेत किंचित गारवा आहे. थंडीची चाहूल?  राज्यात सर्वत्र रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा २ ते ६ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये अपेक्षित असलेली रात्रीची थंडी जाणवत नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत ते सरासरीजवळ किंवा त्याखाली जाण्याची शक्यता असल्याने रात्रीचा गारवा वाढणार आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

मेळघाटावर कुऱ्हाडीचे सावट: १५०० मेगावॅट प्रकल्पासाठी २४० हेक्टर जंगल तोडले जाणार!

ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक, हॅकरचा शोध सुरू

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या 'मफलर मॅन' आरोपांवर प्रतिक्रिया दिली

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय; कुलगुरूंच्या शिफारशीवरून प्र-कुलगुरूंना हटवता येणार

पुढील लेख
Show comments