Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहावीचे गुणपत्रक आजपासून मिळणार

Tenth marks will be available from today Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
, सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (12:12 IST)
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या 10 वी चे गुणपत्रक आज 9 ऑगस्ट पासून मिळणार आहे.अशी माहिती शिक्षण मंडळाच्या सचिवांनी दिली.या संदर्भात पत्र काढल्याचे त्यांनी सांगितले. मान्यता प्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे गुणपत्रक नियोजित केंद्रावर जाऊन घेऊन यावे लागणार.ग्रामीण भागात ही प्रमाणपत्र आणि गुणपत्रक विभागीय मंडळ कार्यालयातून सकाळी 11 ते 1 आणि 1 ते 3 या वेळेत मिळतील. तर शहरी भागासाठी हे गुणपत्रक शिशु  विकास मंदिर शाळेत सकाळी 11 ते 3  वाजे पर्यंत मिळणार. 
 
विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून केंद्रावर जाऊन गुणपत्रक घेऊन जावे असे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आवाहन केले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओबीसी आरक्षणाशी संबंधित महत्त्वाचे विधेयक आज लोकसभेत सादर केले जाईल, विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे