Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे : फडणवीस

thackeray government
, शुक्रवार, 31 जुलै 2020 (15:57 IST)
“ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही. आम्ही आमच्यापरीने, क्षमतेने करोना संकटाशी लढतोय” असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
 
“आतापर्यंत देशाच्या पाठिवर असं तीन पक्षांच सरकार कधीच चाललेलं नाही. देशाच्या या इतिहासात महाराष्ट्र अपवाद ठरेल असं वाटत नाही. महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे एक दुंभगलेलं कुटुंब आहे. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आपसातील अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 
ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी मजबूत सरकार देण्याची जबाबदारी आमची असेल आणि आम्ही तसं सरकार देऊ” असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात अंर्तविरोधामुळेच सरकार पडेल. त्यासाठी कुठल्याही मिशनची गरज नाही असे फडणवीस यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली, मुंबईसह 6 शहरांमधून कोलकाता येथे येणार्‍या विमान वाहतुकीवर 15 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात येणार आहे