16 देश, 59 दिवस आणि 18300 किलोमीटरचा थेट लंडनहून प्रवास करत लंडन मध्ये राहणारा एक मुलगा मुंबईत आपल्या आईला भेटण्यासाठी आला. विराजित मुंगळे असे या मुलाचे नाव आहे. त्यांनी आपल्या कामावरून दोन महिन्यांची रजा घेतली आहे. त्याने मुंबईत येण्यासाठी सुमारे 16 देश पार केले.
सध्या या मुलाचा प्रवास चर्चेत आहे. विराजित ने लंडन ते महाराष्ट प्रवास कार ने केला. त्यांचा हा प्रवास 59 दिवस चालला त्यांनी 18 हजार किलोमीटरचे अंतर कापत 16 देशांचा प्रवास करत मुंबई गाठले.
विराजित हे ब्रिटिश भारतीय आहे त्यांची आई मुंबईला राहते. त्यांनी आईला सरप्राईज देण्यासाठी लंडहून कारने प्रवास करत मुंबई आले.
त्यांना असे करण्याची प्रेरणा ऐतिहासिक सिल्क रोडच्या कथांनी मिळाली. त्यांना असाच प्रवास करण्याची इच्छा होती. त्यांनी 18 हजार किलोमीटरचा प्रवासात 16 देश पार केले आणि त्यांनी प्रत्येक देशाच्या खाद्यपदार्थांची चव घेतली.
त्यांनी एका दिवसाच्या प्रवासांत 400 ते 600 किलोमीटरचे अंतर कापले. सुरक्षितता म्हणून त्यांनी रात्री प्रवास करणे टाळले. घरी आल्यावर आईला भेटले तेव्हा त्यांनी आईचा ओरडा खालला.
त्यांनी या प्रवासासाठी सर्व देशातून आगाऊ मान्यता घेतल्या होत्या. या प्रवासासाठी त्यांनी कामातून 2 महिन्यांची रजा घेतली आहे. या प्रवासात त्यांना आजारपणाला देखील सामोरी जावे लागले. परत जाताना ते आपली एसयूव्ही लंडनच्या जहाजातून परत पाठवणार आणि स्वतः विमानाने जाणार.