Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाची आताची लाट प्रचंड मोठी त्यामुळे लॉकडाउनचे पाऊल उचलले : मुख्यमंत्री

The current wave
मुंबई , गुरूवार, 8 एप्रिल 2021 (09:02 IST)
कोरोनाची ही लाट प्रचंड मोठी आहे. लॉकडाउन किंवा कडक निर्बंधांचे हे पाऊल कोरोना संसर्गाची ही लाट थोपवण्यासाठीच उचलणत आले आहे. ते कुणाविरोधात नाही. त्यामुळे  व्यापार्यांउनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे.
 
त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापार्यांतनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करू या, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बुधवारी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री  राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अतिम देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी सहभागी झाले होते.
 
गेल्यावर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात आठ हजार होती. ही संख्या आता पण पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही  राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या.
 
पण या सुविधाही अपुर्याक पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. 25 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता पंचेचाळीस वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्याजदर ‘जैसे थे'; कर्जदारांना दिलासा