Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कंगना वादात आता राज्यपालांची उडी, राज्य सरकारवर केली नाराजी व्यक्त

Webdunia
गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (15:46 IST)
अभिनेत्री कंगना रानौत प्रकरणी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राजभवनवर बोलवून घेतलं. राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याशी कंगना रानौत हिच्या घरावर झालेली कारवाई आणि या प्रकरणी सरकारची भूमिका याबाबत झाली चर्चा केली. 
 
कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे  शिवसेना खासदार संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. यावर कंगनाने ट्विट करत आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं म्हटलं. या वादानंतर कंगनाला केंद्र सरकारकडून Y सुरक्षा देण्यात आली. 
 
मुंबई महानगपालिकेने कंगनाचं कार्यालय अनधिकृत असल्याचं म्हणत त्यावर कारवाई केली. कंगनाने मुंबईत नसताना तिच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईमुळे कंगनाचे वकील उच्च न्यायालयात गेले तेथे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला. 
 
या सगळ्या प्रकरणात राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचं म्हटलं. यातंच कंगनाने मुंबईत येताच एक व्हिडिओ ट्विट केला. यात मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

कोविड-19 साथीच्या आजारापासून पालकांनी तीन मुलांना बंदिवान ठेवले, राक्षस आणि बाहुल्यांच्या रेखाचित्रांनी बेड भरले होते

नागपुरात जागतिक दर्जाचे थिएटर बांधले जाण्याची चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांनी केली घोषणा

LIVE: सोलापुरात पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गुगल, अॅपलसह 7 कंपन्यांनी आयआयसीटीसोबत करार केला,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले

सोलापुरात पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments