Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपा ने हटवला

The statue of Chhatrapati Shivaji Maharaj was removed by the Municipal Corporation छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपा ने हटवला Marathi Regional News  In Webdunia Marathi
, रविवार, 16 जानेवारी 2022 (10:41 IST)
अपक्ष आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अमरावतीत राजापेठ उड्डाणपुलावर  बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपा ने हटवला आहे. आमदार रवी राणा यांनी हा पुतळा विनापरवानगी बसवला होता. आमदार रवी राणा यांनी पुतळा बसविण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी महापालिकेत केली होती. सध्या अमरावतीत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्यावरून राजकारण तापले आहे. हा पुतळा पहाटे पोलिसांच्या बंदोबस्तीत हटवण्यात आला. हा पुतळा हटवू नयेत अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, मनसेने केली होती. या प्रकरणात आता शिव प्रतिष्ठान ने देखील उडी घरटल्याचे समजले आहे. 
सध्या आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर पोलिसांचे कडक बंदोबस्त करत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाचा विळख्यात आता लहान मुलं