Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही

Kendrane jaheer
, गुरूवार, 29 जुलै 2021 (23:45 IST)
केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईचा पंचनामा केला आहे. २०२० मध्ये महाराष्ट्रावर जे नैसर्गिक संकट आले त्यावेळी केंद्राची टिम पाहणी करण्यासाठी आली होती. त्यावेळी ३ हजार ७०० कोटींची मागणी करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यातील हिशोब करुन ७०० कोटी मंजूर करण्यात आले तेही दादाजी भुसे यांनी सांगितले आहे असेही अजित पवार म्हणाले.
 
आता आम्हीही मुख्यमंत्र्यांचे पत्र दिल्लीत पाठवून रस्ते, शेती, घरे, दुकाने यांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानीचा इत्यंभूत अहवाल तयार करून पाठवणार आहोत. शिवाय केंद्राने या नुकसानीच्या पाहणीसाठी तातडीने टीम पाठवावी अशापध्दतीने कळवले आहे. गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले तशापध्दतीने महाराष्ट्राला पॅकेज देऊ शकतात परंतु तो त्यांचा अधिकार आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tokyo Olympics : ऑस्ट्रेलियन एथलीटचा खुलासा, कंडोमच्या मदतीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले!