Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तक्रारीत तथ्य नाही, ज्योती देवरे यांची अखेर उचलबांगडी

Webdunia
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (21:59 IST)
लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार करत आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर उचलबांगडी झालीय. महिला आयोग आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे देवरेंनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचा अहवाल समितीने सादर केला होता. तर, दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याच आढळून आल्यान त्यांची जळगावला बदली करण्यात आलीय. 
 
पारनेर तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना देवरे यांची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख त्यात होता. दरम्यान, देवरेंनी महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत चौकशीचा आदेश देण्यात आले. दुसऱ्या बाजूला देवरेंविरुद्ध काही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली. त्यात देवरे यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तर, महिला आयोगाकडील तक्रारीत तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं.
 
या अहवालांनंतर राज्य सरकारने देवरे यांच्या बदलीचा आदेश पारित केला. त्यानुसार देवरे यांची पारनेर येथन जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आलीय. हा आदेशच कार्यमुक्ती आदेश समजावा, असेही त्यात आदेशात म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी यांच्यावर पलटवार म्हणाले-

मुंबईत फसवणुकीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश, 19 जणांना अटक

पोलिस स्टेशनचा प्रमुख सांगून कॉलर म्हणाला- दोन एसी पाठवा, खाकीच्या नावावर अशी फसवणूक

रेल्वे स्थानकावर मोठा बॉम्बस्फोट, 24 जण मृत्युमुखी

पुढील लेख
Show comments