यवतमाळ मधील बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द येथील एका शेतकरीच्या शेतातून खत टाकून परत येताना पाण्याने भरलेल्या शेततळात बुडून 2 मुलांचा दुर्देवी अंत झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
राजेंद्र दुतकोर वय वर्षे 15 आणि चेतन सुरेश मसराम वयवर्ष 15 असे या मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. हे मुलं आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी शेतात खत टाकण्याचे काम करायचे.
दररोज प्रमाणे हे मुलं एका शेतकऱ्याच्या शेतात खत टाकण्यासाठी गेली होती.काम आटपून परत येताना त्यांना पाण्याने भरलेले शेततळे दिसले.त्या शेततळ्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि ते दोघे ही त्या शेततळ्यात उतरले.परंतु त्या शेततळात मोठ्या प्रमाणात गाळ होता त्या गाळात ते अडकले.आणि बुडाले. त्यांच्या बरोबर आलेल्या काही मित्रांनी ते बऱ्याच वेळ वर न आल्यामुळे घाबरून या घटनेची माहिती गावकरींना दिली.गावकऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.नंतर त्या मुलांना बाहेर काढण्यात आले.परंतु त्या दोघांचा त्या शेततळात बुडून दुर्देवी अंत झाला.या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.