Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

विक्रोळी येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दोन वृद्धांचा मृत्यू

building collapses in Nalasopara
, शुक्रवार, 31 मे 2024 (08:55 IST)
ईशान्य मुंबईतील विक्रोळी येथे गुरुवारी तीन मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाला. कन्नमवार नगर क्रमांक 1 मधील म्हाडा इमारत क्रमांक 40 येथे सायंकाळी 6.50 वाजता ही घटना घडली, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. ही इमारत 50 ते 60 वर्ष जुनी असून या इमारतीत 40 ते 50 कुटुंब रजत होते. 14 वंशपुरी एका बिल्डर ने इमारतीचे पुनर्विकासासाठी काम सुरु केल्याने काही कुटुंब इतर स्थानी गेली.

सोसायटीच्या वादामुळे पुनर्विकासाचे काम होऊ शकले नाही. या इमारतीत 10 ते 12 कुटुंबे राहत होती. 
शरद म्हसलेकर (75) आणि सुरेश मधळकर (78) यांच्यावर स्लॅबचा काही भाग कोसळून ते जखमी झाले त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  

सदर घटना गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. या इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग पहिल्या मजल्यावर कोसळला शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या काही लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मातीच्या ढिगारा बाजूला केला आणि तळमजल्यावर राहणाऱ्या शरद मशालकर आणि सुरेश म्हाडाकर यांना बाहेर काढले. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले. असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

या घटनेनंतर स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली आणि इतर कुटुंबियांना एका संक्रमण शिविरात तात्पुरती राहण्याची सोय केली.  
 
Edited by - Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chess: भारताच्या प्रज्ञानंदचा कार्लसनवर पहिला विजय,अव्वल स्थान गाठले