Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाविद्यालयीन निवडणुका आता नोव्हेंबर होणार

Webdunia
राज्यात तब्बल २५ वर्षांनी ऑगस्टमध्ये होणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन निवडणुकीसाठी सुरक्षा पुरवणं शक्य नसल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी विनंती राज्याच्या गृहविभागाने राज्य सरकारला केली होती. ही विनंती लक्षात घेऊन राज्य सरकारने ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. 
 
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि जम्मू काश्मिरमधील परिस्थिती लक्षात घेता महाविद्यालयीन निवडणुकीपेक्षा इतर ठिकाणी सुरक्षा पुरवणं आवश्यक असल्याचं गृह विभागाने राज्य सरकारला कळवलं होतं. केंद्र सरकराने राज्यातील नक्षल भागातील सीआरपीएफच्या सहा तुकड्या जम्मू काश्मिरमध्ये तैनात केल्या आहेत.
 
सध्या राज्यातील पोलीस दलाची प्राथमिकता राज्यातील सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्याची असल्याचं सांगत गृह विभागाने महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारं पत्र राज्य सरकारला पाठवलं होतं.  गृहविभागाच्या या पत्रानंतर राज्य मंत्रिमंडळाने महाविद्यालयीन निवडणुका ऑगस्टऐवजी नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE:महाराष्ट्रात २८ ऑगस्टपासून धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होणार

१९९६ मध्ये माझ्याकडून चूक झाली," नितीन गडकरीं यांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाबद्दल मोठे गुपित उघड केले

२०२७ मध्ये जगावर मोठे अन्न संकट? जेपी मॉर्गनचा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?

फडणवीस मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंजुरी

मुख्यमंत्री मदत निधीतून ७९८ रुग्णांना १५.७९ कोटी रुपये मिळाले

पुढील लेख
Show comments