पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील विकास कामांच्या लोकार्पणा निमित्ताने राज्यात १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या दिव्य काशी, भव्य काशी ” या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आ.प्रा.देवयानी फरांदे , आ. अतुल सावे आदी सहभागी होणार आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा, आ.आशीष शेलार , प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग हे मुंबईत, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुणे येथे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर येथे, माजी मंत्री गिरीश महाजन जळगाव येथे, प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे हे शेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत.
परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, घृष्णेश्वर आणि भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात अनुक्रमे राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, आ.देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप,आ.तान्हाजी मुटकुळे, आ.अतुल सावे, ज्येष्ठ नेते आ.हरिभाऊ बागडे, आ.प्रशांत बंब, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे हे भाग घेणार आहेत. वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले हे राज्यातील ५० साधू संतांसह सहभागी होणार आहेत.