कानात हेडफोन लावणे हे धोकादायक आहे. तरीही काही जण कानात हेडफोन लावून गाडी चालवतात किंवा रेल्वेच्या रुळाला ओलांडतात. रेल्वेचे रूळ ओलांडू नये अशी सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते तरीही अनेक जण मनमानी करत आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रूळ ओलांडतात. पण कानात हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडणे एका तरुणीला महागात पडले. या मध्ये तिला आपला जीव गमवावा लागला. ही घटना नाशिकात इगतपुरी येथे घडली. अकरावीत शिकणाऱ्या तरुणीने कानात हेडफोन लावत रेल्वे रूळ ओलांडताना येणाऱ्या गाडीचा आवाज आला नाही आणि रेल्वेची धडक लागून तिचा दुर्देवी अंत झाला. प्रियंका नामदेव कोकणे (17) असे या मयत तरुणीचं नाव असून इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावातील ही तरुणी कानात हेडफोन लावून मोबाईलवर बोलत महाविद्यालयासाठी रेल्वे फाटकाजवळ आली आणि कानात हेडफोन लावल्यामुळे तिला येणाऱ्या रेल्वेचा आवाज ऐकू आला नाही आणि रेल्वे खाली चिरडून तिचा अंत झाला. या घटनेमुळे तिच्या गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.