Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो : नारायण राणे

Sharad Pawar Saheb
Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (07:54 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं. मात्र, शिवसेनेबाबतच्या त्यांच्या विधानावरून भाजपाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे.भाजपा आमदार राम कदम यांनी यासंदर्भात शरद पवारांना लक्ष्य केलेलं असताना आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी शरद पवारांच्या विधानावर खोचक ट्वीट केलं आहे. “शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत. 
 
दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये नारायण राणे लिहितात, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असं म्हणाले आहेत. जरी शरद पवार असं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत”, असं भाकित राणेंनी या ट्वीटमध्ये केलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यातही मांस आणि मद्य प्रसाद म्हणून अर्पण केले जाते

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

श्रावणात चुकूनही या गोष्टी खाऊ नका, नाहीतर रुग्णालयात दाखल व्हायची वेळ येऊ शकते

पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे 5 सोपे योगासन उपयुक्त ठरू शकतात

Parenting Tips: मुलांमधील मोबाईल व्यसन सोडवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

सर्व पहा

नवीन

१५ ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर बंदी घालण्यात आल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, इशाऱ्यानंतर कल्याणमध्ये सुरक्षा वाढवली

लाडक्या बहिणींची राखी फिकट झाली, या तहसीलमधील ३४ हजार लाभार्थ्यांना २ महिन्यांपासून १५०० रुपये मिळाले नाहीत

भाचीच्या हत्येनंतर एक वर्षानंतर मावशी-काकांना अटक; गादीत गुंडाळलेला मृतदेह फेकल्याचा आरोप

महादेवी हत्तीणीला कोल्हापूरला परत आणण्याचे प्रयत्न तीव्र

मतदार यादीत त्रुटी आढळल्यास राजीनामा देईन! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे काँग्रेस खासदारांना आवाहन

पुढील लेख
Show comments