Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोंबड्याला मांजर बनवून कोकणचे प्रश्न सुटणार का? - अजित पवार

Will the problem of Konkan be solved by making chicken into cat? - Ajit Pawar कोंबड्याला मांजर बनवून कोकणचे प्रश्न सुटणार का? - अजित पवारMarathi Regional News In Webdunia Marathi
, सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:39 IST)
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करताना नितेश राणे यांनी काढलेल्या आवाजानंतर नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्यात प्राण्यांची चित्र पोस्ट करत ट्विटरवर युद्ध रंगलं.
या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंना फटकारलं आहे. "कोंबड्यांना मांजर केलं जात असल्याचं मी टीव्हीवर पाहत आहे, पण अशाने कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का? कोकणाचा विकास होईल का?" असं अजित पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी नारायण राणेंवरही हल्लाबोल केला. "संस्था उभ्या करायला अक्कल लागते, मात्र, संस्था अडचणीत आणायला अक्कल लागत नाही," असं अजित पवार रत्नागिरीमध्ये म्हणाले.
तर कणकवलीतील मारहाण प्रकरणी पोलिस अधिकाराचा गैरवापर करत नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्या अटकेसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
यावेळी नारायण राणेंनी पवारांनाही प्रत्युत्तर दिलं. "पवार अक्कल लागते असं त्यांच्या कार्यकर्त्यांनाच म्हणाले. पण सत्तेमध्ये असलेल्यांनी अकलेचे काय तारे तोडले, हे सर्वांना कळालं आहे" अशी टीका त्यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टीईटी घोटाळा : अश्विन कुमार यांच्याकूडून एक कोटींपेक्षा अधिकचा ऐवज जप्त