महिलांनो तुम्ही कमकुवत नाही आत्मनिर्भर व्हा, तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिले तर त्याला धडा शिकवा, महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहिल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.
महिलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे,मला कोणाचीही गरज नाही असा आत्मविश्वास बाळगला पाहिजे.कुणी तुमच्यावर वाईट नजर टाकली तर त्याला धडा शिकवला पाहिजे.तुमचे अनुकरण संपूर्ण देशाने केले पाहिजे, महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहिल. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.
पोलीसांबद्दल तळमळ,आपुलकी,आस्था आहे. पोलीस 18 तास काम करतात.ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता जनतेचे रक्षण करतात.गेली दिड वर्ष कोरोनाशी आपण लढत आहोत.या लढाईत अनेक पोलीस बाधित झाले, काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्र पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी काम करीत आहेत.सातारा पोलीस दलाने महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पास विविध समाज माध्यमांचा वापर करुन आधुनिकतेशी सांगड घातली आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.