Dharma Sangrah

Birthday Wishes For Brother in Marathi भावला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

वेबदुनिया फीचर टीम
बुधवार, 24 जून 2026 (16:49 IST)
माझ्या आयुष्यातील चांगला मित्र 
आणि प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे 
पाठीशी उभा राहणाऱ्या माझ्या प्रिय भावाला 
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! 
तू नेहमी आनंदी राहा
 
भावापेक्षा चांगला मित्र जगात कोणीच असू शकत नाही 
आणि तुझ्यासारखा भाऊ मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ! 
 
आई-बाबांनंतर ज्याच्यावर मी हक्काने रागवू शकतो 
आणि जो माझी प्रत्येक हट्ट पूर्ण करतो, 
अशा माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 
 
देवाकडे एकच प्रार्थना आहे की, 
तुझ्या आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची 
कमतरता भासू नये
तुला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो
हॅपी बर्थडे भाई! 
 
लहानपणीच्या आठवणींपासून ते आजच्या धावपळीच्या आयुष्यापर्यंत, 
तू नेहमीच माझी साथ दिलीस
माझ्या पाठीशी असणाऱ्या 
माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
 
दिसायला देखणा, 
स्वभावाने दिलदार 
आणि मित्रांसाठी कायपण करणारा 
आपला लाडका भाऊ... 
तुला वाढदिवसाच्या कडक आणि शिवशाही शुभेच्छा! 
 
भावा, तू फक्त माझा भाऊ नाहीस 
तर माझा अभिमान आहेस
तुझा रुबाब आणि तुझी चर्चा 
अशीच कायम राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 
 
हक्काचा माणूस आणि मनाचा राजा... 
अशा माझ्या डॅशिंग भावाला 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस तुझा आहे, एकदम धुमाकूळ घाल! 
 
लोकांच्या आयुष्यात सेलिब्रिटी असतील, 
पण माझ्या आयुष्यातील सुपरहिरो 
आणि एकमेव 'किंग' फक्त माझा भाऊ आहे
हॅपी बर्थडे टू यू ब्रदर! 
 
नात्यात भाऊ आणि मनातून अगदी जिवाभावाचा मित्र असलेल्या 
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
गॉड ब्लेस यू! 
 
जगातील सर्वात जास्त त्रास देणाऱ्या, 
पण तितकाच जास्त जीव लावणाऱ्या 
माझ्या लाडक्या नमुन्याला (भावाला) 
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! 
पार्टी कधी देतोयस ते सांग? 
 
माझे कपडे चोरून घालणाऱ्या 
आणि आई-बाबांसमोर माझी चुगली करणाऱ्या 
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू आहेस म्हणून घरात करमणूक आहे! 
 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा! 
देव तुला खूप बुद्धी देवो (कारण त्याची तुला जास्त गरज आहे) 
आणि तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होवोत
 
जरी आपण रोज भांडत असलो, 
तरी तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही
जगातील सर्वात भारी भावाला वाढदिवसाच्या 'धिंगाणा' शुभेच्छा! 
 
रक्ताच्या नात्याने भाऊ 
आणि स्वभावाने माझा क्राईम पार्टनर असणाऱ्या 
माझ्या भावाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आजची पार्टी जोरात झाली पाहिजे! 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

क्रिस्पी क्रीम रोल रेसिपी, घरी सहजपणे बनवण्याची सोपी पद्धत येथे पहा

काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने खरंच नुकसान होते का? तज्ज्ञ काय सांगतात

बारावीनंतर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे? डिप्लोमा, पात्रता, कॉलेज आणि लाखोंच्या पगाराची संपूर्ण माहिती

सकाळी उठल्यावर चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी करा हे उपाय

लघु कथा : गरुड आणि कोंबडी; गोष्ट सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची

पुढील लेख
Show comments