Publish Date: Sat, 19 Sep 2026 (18:03 IST)
Updated Date: Sat, 19 Sep 2026 (18:09 IST)
हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करून त्यांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंड दान केले जाते. वर्ष २०२६ मध्ये पितृ पक्ष २६ सप्टेंबर २०२६ ते १० ऑक्टोबर २०२६ या काळात असणार आहे.
पितृ पक्ष २०२६ ची महत्त्वाची माहिती
सुरुवात: २६ सप्टेंबर २०२६ (शनिवार/रविवार रात्री)
समाप्ती: १० ऑक्टोबर २०२६ (सर्वपित्री अमावस्या / महालय अमावस्या)
कालावधी: हा सोळा दिवसांचा पवित्र काळ असतो.
पितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६
पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६
प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६
द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६
तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६
चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६
षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६
सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६
अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६
नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध)
दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६
एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६
द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध)
मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६
त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध)
चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध)
सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)
आपल्या पूर्वजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा काळ समर्पित आहे. ज्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसते, ते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करू शकतात. या दिवसांत प्रामुख्याने तर्पण, पिंडदान व ब्राह्मण भोजन घातले जाते. यादरम्यान कोणतेही नवीन शुभ कार्य किंवा खरेदी केली जात नाही.