Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Australian Open: सानिया मिर्झाचे शेवटचे ग्रँडस्लॅमचे स्वप्न भंगले, मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव

Australian Open: सानिया मिर्झाचे शेवटचे ग्रँडस्लॅमचे स्वप्न भंगले, मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव
, शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (09:37 IST)
सानिया मिर्झाला तिच्या शेवटच्या ग्रँडस्लॅममध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया आणि रोहन बोपण्णा यांचा 6-7, 6-2 असा पराभव झाला. ही तिची शेवटची स्पर्धा असेल, असे सानियाने आधीच जाहीर केले होते. यानंतर ती महिला दुहेरीत दुसऱ्या फेरीत बाहेर पडली आणि मिश्र दुहेरीत तिला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने सानियाचे विजयी निरोपाचे स्वप्न भंगले.
 
ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत लुईसा स्टेफनी आणि राफेल मॅटोस या ब्राझीलच्या जोडीने सानिया आणि रोहन यांचा ६-७, २-६ अशा फरकाने पराभव केला. या पराभवासह सानियाची दिग्गज टेनिस कारकीर्द संपुष्टात आली. 
 
सानिया मिर्झाने तिच्या कारकिर्दीत तीन महिला दुहेरी ग्रँडस्लॅम आणि तीन मिश्र दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत. तर बोपण्णाने मिश्र दुहेरीचे एक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. सानिया आणि बोपण्णा या बिगरमानांकित भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या उपांत्य फेरीत डेसिरिया क्रॉझिक आणि नील स्कुप्स्की यांचा 7-6(5), 6-7(5), 10-6 असा पराभव केला. या जोडीला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वॉकओव्हर मिळाला.
 
उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीला एका सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन ही पुरुष दुहेरी जोडी पहिल्याच फेरीत पराभूत झाली. महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत सानिया आणि कझाकस्तानची अॅना डॅनिलिना यांचा पराभव झाला.
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आनंद दिघें जयंती 2023 : आनंद दिघेंची 'ती' रिकामी खुर्ची आजही शिवसेनेच्या शाखेत आहे कारण ...