दिएगो मॅराडोना यांच्या निधनाने फुटबॉल वर्तुळात शोकाकुल वातावरण असताना आणखी एका स्टार खेळाडूने जगाचा निरोप घेतला आहे. सेनेगल फुटबॉल संघाचा मिडफिल्डर पापा बाउबा डिओप याचे रविवारी रात्री 42 व्या वर्षी निधन झाले. 2002 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बाउबाच्या गोलने वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्सला पराभवाचा धक्का दिला होता.
तो बर्याच दिवसांपासून आजारी होता. बाउबाने 2001 ते 2008 या कालावधीत 65 सामने खेळले. सेनेगलला 2002 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्पूर्व फेरीत प्रवेश करून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आतापर्यंत तीन आफ्रिकन देशांनी वर्ल्ड कपच्या अंतिम 8 संघांमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी एक सेनेगल आहे.
बाउबाने 2002 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या फ्रान्सविरुद्ध विजयी गोल केला होता. त्यानंतर उरुग्वेला 3-3 असे बरोबरीत रोखून आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना टर्कीकडून पराभव पत्करावा लागला. बाउबाने चारवेळा आफ्रिका चषक राष्ट्रीय स्पर्धेत सेनेगलचे प्रतिनिधित्व केले आणि 2002 मध्ये त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
2004 मध्ये त्याने इंग्लिश क्लब फुल्हॅचे प्रतिनिधित्व केले आणि 2008 च्या एफए चषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता.