नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या नीतू घनघसने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
48 किलो वजनी गटात मंगोलियाची बॉक्सर लुतसाइ खान हिला 5-0 ने हरवून नीतूने सुवर्णपदक पटकावलं.
ही स्पर्धा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममध्ये सुरू आहे.
शनिवारी (25 मार्च) झालेल्या एकतर्फी सामन्यात नीतूने लुतसाइ हिला सहज नमवलं.
या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती सहावी भारतीय बॉक्सर बनली आहे.
सेमीफायनल सामन्यात नीतू घनघसने कझाकस्तानच्या अलुआ बालकिबेकोआ हिला हरवलं होतं.
या स्पर्धेत नीतूशिवाय इतर भारतीय बॉक्सर्सनीही चांगली कामगिरी केली.
आता 81 किलो वजनी गटातील अंतिम फेरीत भारताची स्वीटी बुरा हिचा सामना चीनच्या वांग लीना हिच्याशी आहे.
सेमीफायनलमध्ये स्वीटी बुराने ऑस्ट्रेलियाच्या एमा सु ग्रीनट्री हिला 4-3 ने हरवलं होतं.
Published By -Smita Joshi