सर्बिया ओपनच्या अंतिम फेरीत आंद्रे रुबलेव्हने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत मोसमातील तिसरे विजेतेपद पटकावले. रशियाचा रुबलेव्ह प्रथमच सर्बिया ओपनमध्ये खेळत होता आणि त्याने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली. रुबलेव्हने जोकोविचविरुद्ध जबरदस्त ताकद दाखवत त्याचा घरच्या मैदानावर 6-2, 6-7, 6-0 असा पराभव केला. जोकोविच आपल्या घरच्या मैदानावर विजयाचा प्रबळ दावेदार होता.
पहिला सेट 6-2 असा सहज जिंकल्यानंतर रुबलेव्हने दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारली, पण 24 वर्षीय खेळाडूने पाच गुण वाचवून सामना टायब्रेकमध्ये नेला. मात्र, जोकोविच हा सेट जिंकण्यात यशस्वी ठरला.
रुबलेव्हने 2022 साली जेतेपद पटकावण्याच्या बाबतीत स्पेनच्या राफेल नदालची बरोबरी केली आहे.