Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

US Open 2023:जोकोविचने मेदवेदेवचा पराभव करत 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले

novak djokovi
, सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (17:11 IST)
US Open 2023: नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून 24 वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले. चुरशीच्या लढतीत सर्बियाच्या 36 वर्षीय अनुभवी खेळाडूने  6-3, 7-6 (7-5), 6-3 असा विजय मिळवला.
 
जोकोविचने पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. यानंतर दुसरा सेट जोकोविच आणि मेदवेदेव यांच्यात एक तास 44 मिनिटे चुरशीची लढत झाली. जोकोविचने हा सेट 7-6 (7-5) ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने मेदवेदेवचा 6-3 असा पराभव करत विजय मिळवला.
 
जोकोविचचे यूएस ओपनचे चौथे विजेतेपद पटकावले. या वर्षाच्या सुरुवातीला जोकोविचने राफेल नदालचा 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला होता. जोकोविचला जुलैमध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तथापि, त्याने 2023 मध्ये चारपैकी तीन ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत.
 
जोकोविच ने आत्ता पर्यंत 36 वेळा ग्रँड स्लॅम फायनल खेळले आहे आणि 24 विजेतेपद पटकावले. तो 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आणि सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन ठरला आहे. फ्रेंच ओपनचे जेतेपदही तीन वेळा जिंकले आहे
 
जोकोविच ने अमेरिकेच्या बेन शेल्टन यांना  6-3, 6-2, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत होऊन सातव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शेल्टनविरुद्धचा सामनाही या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील त्याचा 100 वा सामना होता. 7-6 ने पराभूत केले आणि सातव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शेल्टनविरुद्धचा सामनाही या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील त्याचा 100 वा सामना होता. 7-6 ने पराभूत केले आणि सातव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शेल्टनविरुद्धचा सामनाही या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील त्याचा 100 वा सामना होता.
 
जोकोविचने अखेरचे यूएस ओपनचे विजेतेपद 2018 मध्ये जिंकले होते. या या स्पर्धेनंतर जोकोविच पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर येईल. जोकोविचने तिसर्‍यांदा एकाच वर्षी चारही मोठ्या स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.
 
Edited by - Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tamil Nadu : रस्ते अपघातात 7 महिलांचा दुर्देवी मृत्यू