Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आपली कार चोरट्यांपासून वाचविण्यासाठी काही खास टिप्स

आपली कार चोरट्यांपासून वाचविण्यासाठी काही खास टिप्स
, गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (15:25 IST)
आपण आपल्या कारचा विमा काढला आहे या भरवश्यावर कार चोरी होण्याच्या संभाव्यतेबद्दल निश्चिन्त आहात. जर असं काही असेल तर हे जाणून घ्या की कार चोरी झाल्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया करणे आणि नंतर विमा वर हक्क दाखविण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि गोंधळात टाकणारी असते. बऱ्याच वेळा असे ही घडले आहे की या गोंधळे मुळे त्रस्त झालेले लोक उमेदच गमावून बसतात. अशा परिस्थिती पासून वाचण्यासाठी आधीच सावधगिरी बाळगावी, जेणे करून कार चोरी होण्याची शक्यता टाळता येईल. चला जाणून घेऊ या अशा काही टिप्स.

* कारच्या आत काहीही मौल्यवान वस्तू ठेवू नये - 
बरेच लोक कारच्या आतील सीटवर लॅपटॉप, बॅग, पर्स ठेवतात, जी चोरट्यांना लगेच आकर्षित करतात. जर आपण देखील आपल्या कारमध्ये अश्या काही मौल्यवान वस्तू ठेवल्या असतील तर सावधगिरी बाळगा आणि दुर्लक्ष करू नका. जर आपल्याला वस्तू ठेवणे आवश्यकच आहे तर सर्व सामान कारच्या डिक्कीमध्ये लपवून ठेवा किंवा एखाद्या अश्या जागी ठेवा ज्याच्या वर कोणाचीही दृष्टी पडता कामा नये. अश्या प्रकारची केलेली चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. जर आपल्या कारमध्ये सेंटर लॉकची सुविधा आहे, तरी ही आपण जोखीम घेऊ नका, कारण कारचा काच तोडायला चोरट्यांना काहीच वेळ लागत नाही.
 
* अधिकृत ठिकाणीच सर्व्हिसिंग करावी -
आपण या गोष्टीची कल्पना केली आहे का की आपल्या कारच्या किल्लीचे क्लोन केले तर काय होईल ? असे बऱ्याच वेळा घडते की जेव्हा आपण मेकॅनिक कडे जाता तर तो मेकॅनिक चोरट्यांच्या टोळीला सामील असेल किंवा आपल्या कारची डुप्लिकेट किल्ली बनवून त्यांना देईल. या नंतरची कल्पना आपण स्वतःच करा की काय होईल? अशा परिस्थितीत अधिकृत ठिकाणीच कारची दुरुस्ती आणि सर्व्हिस करवावी. आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला कार सुधारविण्याची गरज पडली तर कार आपल्या समोरच दुरुस्त करवावी.

* बेवारशी गाडी सोडू नका-
 जर आपली कार पार्किंग किंवा एखाद्या ऑफिसच्या जागेच्या बाहेर उभारली असेल आणि आपण ती कार आठवड्या भर देखील वापरत नसाल आणि त्याची स्वच्छता देखील करत नसाल, तर अशी कार चोरट्यांच्या नजरेस येते. चोरट्यांना हे लक्षात येत की त्या कार कडे कोणाचे लक्ष नाही आणि त्यांचे काम सोपे होते.
 
* कार सुरक्षित करा - 
बाजारपेठेत अशी अनेक साधने आहेत जी आपली कार अधिक सुरक्षित ठेवतात. या मध्ये टायर लॉक, स्टियरिंग लॉक, गिअर लॉक, सारखे टूल्स आपली मदत करतात. जीपीएस ट्रेकिंग सिस्टम देखील या मध्ये आपली मदत करतं. जर आपण नवीन कार घेण्याचा विचार करीत आहात तर प्रयत्न करा की आधुनिक वैशिष्ट्ये उपलब्ध असणारे जसे की अँटी थेफ्ट, इंजिन इमोबिलायझर, सिक्योरिटी अलार्म, सेंट्रल लॉकिंग इत्यादी.
 
* इन्शुरन्स रिन्यूअल करण्यात दुर्लक्ष करू नका - 
आपण कितीही प्रगत आहात, पण दिवसेंदिवस चोरटे देखील लबाड बनत आहेत. देव न करो की आपला एखादा अपघात झाला तर त्वरितच पोलिसात तक्रार नोंदवा आणि त्यापूर्वी आपल्या कारच्या इन्शुरन्स ला रिन्यू ठेवा. जरी आपली कार जुनी असेल, पण सतत रिन्यू केल्यानं आपण काळजी पासून मुक्त राहतो. जरी या कामत गोंधळ असला तरी पण आपल्या वाईट काळात कारचे मूल्य आपल्याला विमा कंपनी कडून मिळते.या व्यतिरिक्त, बरेच लोक बेट्रीच्या संरक्षणासाठी लोखंडी ग्रीप बनवून मॅन्युअल लॉक देखील लावतात. तथापि, बरेच लोक अशा गोष्टींना प्राधान्य देत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाशय धरमपाल गुलाटी: एकेकाळी टांगा चालवणारा तरुण कसा बनला मसाल्याचा शहेनशाह?