Dharma Sangrah

नोकरी बदल्यावर PF खात्यामध्ये घरबसल्या करा अपडेट

Webdunia
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (13:06 IST)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ग्राहकांना ऑनलाइन सुविधा प्रदान करत आहे. या सुविधेमुळे अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या अनेक कामं करता येऊ शकतात. ईपीएफओमध्ये क्लेम करून हक्काचे पैसे देखील अगदी सहज मिळवता येतात. क्लेम करण्याव्यतिरिक्त EPFO ने आणखी सुविधा प्रदान केली आहे. आता नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यामध्ये नोकरी सोडल्याची तारीख अर्थात डेट ऑफ एक्झिट अपडेट करण्यासाठी कंपनीमध्ये जाण्याची गरज नाही. आता कर्मचारी स्वत: ही तारीख अपडेट करू शकतात. 
 
ऑनलाइन पद्धतीने हे काम अगदी सोप्यारीत्या पूर्ण करता येतं. जाणून घ्या पद्धत- 
फॉलो करा या सोप्या स्टेप्स
 
सर्वात आधी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर क्लिक करा. 
येथे UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. 
Manage वर जाऊन Mark Exit वर क्लिक करा.
ड्रॉप डाऊन अंतर्गत select employment मधून PF Account Number निवडा. 
मग Date of Exit आणि Reason of Exit यात तपशील भरा.
नंतर Request OTP वर क्लिक करा. 
आधारशी लिंक्ड असणाऱ्या मोबाइल क्रमांकावर आलेला OTP भरा. 
नंतर चेकबॉक्स सिलेक्ट करून अपडेटवर क्लिक करा.
Ok केल्यानंतर Date of Exit अपडेट होईल.
 
या सोप्या पद्धतीने नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यामध्ये नोकरी सोडल्याची तारीख अर्थात डेट ऑफ एक्झिट अपडेट करता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: शहीद संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी

जिओ आरोग्य एआयने काही मिनिटांत आरोग्य तपासणी, एआय क्लिनिक मॉडेल सादर

कुटुंबावर ओझे बनू नका, आनंदी राहा; चिठ्ठी लिहून अकरावीच्या विद्यार्थिनीची १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

वर्धा जिल्ह्यात अपघात; नवी दिल्ली-चेन्नई एक्सप्रेसच्या एसएलआर कोचमध्ये भीषण आग

शहीद संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पुढील लेख
Show comments