Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

तिमिराकडून तेजाकडे नेणारा दीप अमावस्येचा हा सण 
तुमच्या आयुष्यात सुखाचा, समृद्धीचा
आणि आरोग्याचा लख्ख प्रकाश घेऊन येवो
दीप अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
जशी दिव्याची वात अंधार दूर करते, 
तसाच तुमच्या आयुष्यातील सर्व ताणतणाव 
आणि दुःख दूर होवो
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आज दिव्यांच्या पूजनाचा सण... 
तुमच्या घरातील मंगल दीप 
असाच अखंड तेवत राहो 
आणि समृद्धीची उधळण होत राहो
दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!
webdunia
दीपांचा हा पावन उत्सव तुमच्या आयुष्यात 
आनंदाची नवी पहाट घेऊन येवो
घरातील प्रत्येक कोपरा तेजाने उजळून निघो
दीप पूजन आणि अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अंधारावर मात करणाऱ्या 
या दिव्यांच्या सणाच्या दिवशी, 
तुमच्या जीवनातील सर्व संकटे 
दूर व्हावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
दीप अमावस्येच्या शुभेच्छा!
 
ज्याप्रमाणे पणती स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देते, 
तसेच प्रेम आणि आपुलकीचे दीप 
आपण सर्वांच्या मनात तेवत ठेवूया
दीप अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
webdunia
आषाढ अमावस्येच्या या शुभ दिनी 
तुमच्या घरावर ईश्वराची अखंड कृपा राहो 
आणि घरात सुख-शांतीचा वास असो
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दिव्यांची आरास आणि मांगल्याची आस, 
दीप अमावस्येचा हा सण घेऊन येवो 
तुमच्या आयुष्यात गोडवा आणि खास उल्हास
दीप पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
समयीच्या दिव्यासारखं तुमचं आयुष्य प्रकाशमय होवो 
आणि प्रत्येक ध्येय साध्य होवो
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 
दीप अमावस्येच्या शुभेच्छा!
webdunia
दिवा हा केवळ प्रकाश देत नाही, 
तर तो आशेची किरण दाखवतो
तुमच्या आयुष्यात नेहमी आशेचा 
आणि प्रगतीचा दिवा तेवत राहो
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
webdunia
आषाढाची ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील 
सर्व नकारात्मकता दूर करो 
आणि आरोग्याची उत्तम भेट देवो
दीप पूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
उजळू दे परिसर दिव्यांच्या तेजाने, 
भरू दे घर सुख, शांती अन् समृद्धीने
दीप अमावस्येच्या आणि आषाढ अमावस्येच्या 
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
webdunia



Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Deep Amavasya Wishes Images: दीप अमावस्येनिमित्त पाठवा हे सुंदर मेसेज आणि डिजिटल शुभेच्छा!