Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pranayama Benefits: 5 मिनिट प्राणायाम करण्याचे फायदे जाणून घ्या

Benefits of Pranayama
, रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (05:00 IST)
योग करण्याचे अनेक फायदे आहेत, यात प्राणायाम हे लोकांमध्ये चांगले प्रचलित आहे. यात आपल्या श्वासांवर नियंत्रण करायचे असते. हे आरोग्यासाठी सकरात्मक असते. चला जाणून घेऊ या प्राणायाम करण्याचे फायदे. 
 
आरोग्यदायी फुफ्फुसे- प्राणायाम रोज केल्याने तुमचे फुफ्फुसे चांगले राहतात. प्राणायाम मध्ये खोल आणि लांब श्वास घेतला जातो. प्राणायाम केल्याने तुमच्या फुफ्फुसात असलेल्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सीजन पोहोचतो. प्राणायाम आपल्या फुफ्फुसांना मजबूत बनवते. 
 
चांगली झोप- आजच्या काळात लोकांचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. प्रत्येक व्यक्ती तणावमुक्त झोप अपेक्षित करते. जर झोप चांगली होत नसेल तर शरीरात अनेक प्रकारचे आजार घर करतात. रोज प्राणायाम केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल. प्राणायाम तुमच्या शरीराला तणावमुक्त करेल. ज्यामुळे तुम्ही चांगली झोप घेऊ शकल. 
 
रक्तचाप कमी करते- प्राणायाम तुमच्या शरीरातील हाय ब्लडप्रेशरला कमी करण्यास मदत करते. उच्च रक्तचापामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच स्ट्रोकचि भीति वाढू शकते. जर ब्लडप्रेशर कंट्रोलच्या बाहेर गेले तर अनेक प्रकारचे आजार शरीरात घर करतात. याकरिता रोज प्राणायाम करणे ज्यामुळे तुमचे शरीर आरोग्यदायी राहील. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Edited By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती शिवाजी महाराज - प्रमुख युद्धांचा इतिहास