Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मासिक पाळीच्या काळात हे आसन आराम देतात

मासिक पाळीच्या काळात हे आसन आराम देतात
, शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (18:20 IST)
मासिक पाळीच्या दरम्यान बऱ्याच स्त्रिया वेदनेमुळे अस्वस्थ होतात. त्यांच्या ओटीपोटात आणि कंबरे मध्ये खूप वेदना होतात की त्या कोणते ही काम करू शकत नाही.या दिवसात बद्धकोष्ठता आणि तणाव सारख्या समस्या देखील उद्भवतात.अशा परिस्थितीत स्त्रियांना हा काळ काढणे कठीण होत. बऱ्याच बायका या काळात काही औषधे घेतात. ज्यामुळे दुष्परिणाम होतात की त्यांची मासिक पाळी अनियमित होते. म्हणून योगच असा एकमेव उपचार आहे ज्याच्या साहाय्याने आपण मासिक पाळीच्या वेळी उद्भवणाऱ्या समस्या पासून आराम मिळवू शकता. या साठी काही असे आसन आहे ज्यांचा सराव केल्यानं आपण या वेळेच्या वेदनेला सहजपणे घालवू शकता. 
 
1 धनुरासन 
हे आसन केल्यानं शरीराचा आकार धनुष्य प्रमाणे दिसतो म्हणून ह्याला धनुरासन म्हणतात. जेव्हा शरीर बाणाच्या मुद्रेत असतो तेव्हा पोटावर जोर पडतो. या मुळे पोटाचे स्नायू आणि प्रजनन अवयवांना सामर्थ्य मिळतो आणि मासिक पाळीचे त्रास आणि बद्धकोष्ठता पासून मुक्ती मिळते. मासिक पाळी असल्यावर आपल्या क्षमतेनुसारच या योगाचा सराव करा.
 
2 उष्ट्रासन- 
ह्याला कॅमल पोझ देखील म्हणतात. हे आसन करताना शरीराचा पुढील भाग ओढला जातो, ज्यामुळे पाठीच्या खालील भागाची वेदना दूर होते.तसेच मासिक पाळी मध्ये पोटदुखीचा त्रास कमी होतो. जर मासिक पाळी अनियमित आहे तर दररोज ह्याचा नियमितपणे सराव केल्यानं मासिक पाळी नियमित होते आणि रक्त प्रवाह देखील सामान्य होतो. म्हणून 15 ते 20 सेकंद दररोज ह्याचा अभ्यास करा.
 
3 भुजंगासन -
या आसना मध्ये शरीराचा आकार कोब्रा सारखा असतो म्हणून ह्याला कोब्रा पोझ देखील म्हणतात. हे आसन करताना शरीराचा आकार असा बनतो की करताना पोटावर ताण येतो मासिक पाळीची वेदना कमी होते. या दिवसात स्त्रियांना थकवा आणि तणाव होतो ज्यामुळे त्यांना चिडचिड होते हे आसन केल्यानं ही समस्या दूर होते.
 
4 मत्स्यासन -
हे आसन करताना पाठ वर उचलायची असते, ज्या मुळे पोटाच्या स्नायूंमध्ये तणाव होतो आणि ओटीपोटाच्या वेदनेमध्ये आराम मिळतो. मासिक पाळीच्या दरम्यान सकाळी उठल्यावर हे आसन करण्याच्या पूर्वी दोन ते 3 वेळा दीर्घ श्वास घ्या. असं केल्यानं चांगले परिणाम मिळतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिरवे वाटाणे हे जीवनसत्त्वे यांचे पावरहाउस आहेत, हिवाळ्यात खाण्याचे 6 फायदे जाणून घ्या