भारतात ब्रिटीश साम्राज्याविरोधात झालेल्या 1857 च्या उठावात झाशीच्या राणीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासंबंधी झाशीच्या राणीचं एक महत्त्वाचं पत्र लंडनमधल्या ब्रिटिश आर्काईव्हजमध्ये आहे.
1857 च्या उठावाच्या काही दिवसांपूर्वीच झाशीच्या राणीने ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांना हे पत्र लिहिलं होतं.
लॉर्ड डलहौसी यांना लिहिलेलं पत्र
लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड एलबर्ट म्युझियमच्या रिसर्च क्युरेटर दीपिका अहलावत यांनी या पत्रासंबंधी सविस्तर माहिती दिली.
त्या म्हणतात, "बॉरिंग कलेक्शन नावाने ओळखल्या जाणाऱ्या कागदपत्रात या पत्राचाही समावेश आहे. लेविन-बेथम बॉरिंग एक ब्रिटीश अधिकारी होते. त्यांनी भारतीय राजे-महाराजे यांची चित्र, त्यांच्याशी संबंधित कागदपत्र आणि इतर साहित्य गोळा केले होते."
झाशीच्या राणींनी लिहिलेल्या या पत्रात त्या रात्रीचा उल्लेख आहे ज्या रात्री त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. ईस्ट इंडिया कंपनीने 'डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स' नावाचं एक धोरण आखलं होतं. या धोरणानुसार भारतीय संस्थानचा राजा अक्षम असेल किंवा संस्थानसाठी वारस जन्माला घालण्याआधीच त्याचा मृत्यू झाला तर ते संस्थान विसर्जित होईल.
पत्रात या डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सच्या भीतीने झाशीला नवा राजा मिळावा, यासाठी त्यांच्या पतीने विधिवत एका मुलाला दत्तक घेतलं होतं. त्याचं नाव दामोदर. मात्र, लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक दामोदरचा वारस म्हणून स्वीकार केला नाही, असा उल्लेख केला आहे.
ऑस्ट्रेलियन वकिलाची मदत
दामोदरला वारस म्हणून मान्यता मिळावी, यासाठी झाशीच्या राणीने जॉन लँग या ऑस्ट्रेलियन वकिलांचीही मदत घेतली होती.
राणी लक्ष्मीबाई यांनी जेव्हा दामोदरला दत्तक घेतलं तेव्हा इंग्रजांनी ते बेकायदेशीर घोषित केलं. त्यामुळे राणी लक्ष्मीबाईंना त्यांचा झाशीचा महाल सोडावा लागला.
त्यांनी 'रानी महल' नावाच्या एका तिमजली हवेलीमध्ये आश्रय घेतला होता.
कायदेशीर लढाईसाठी राणीने वकील जॉन लँग यांची मदत घेतली. त्यांनी नुकताच ब्रिटिश सरकारच्या विरोधातला एक खटला जिंकला होता.
लँग यांचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता आणि ते मेरठमध्ये The Moffusilite नावाचं एक वर्तमानपत्र चालवत होते.
लँग यांना फारसी आणि हिंदुस्तानी अशा दोन्ही भाषा चांगल्या येत होत्या. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर नाराज होते कारण लँग नेहमीच त्यांना कायदेशीररीत्या घेरण्याचा प्रयत्न करत होते.
लँग जेव्हा पहिल्यांदा झाशीला आले तेव्हा राणीने त्यांना आणण्यासाठी एक घोड्यांचा रथ आग्र्याला पाठवला.
त्यांना झाशीला आणण्यासाठी राणीने आपले दिवाण आणि एका जवळच्या अनुयायाला पाठवलं होतं.
या अनुयायाच्या हातात बर्फानं भरलेली एक बादली होती. त्यात पाणी, बियर आणि निवडक वाइनच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. पूर्ण रस्त्यात एक नोकर त्यांना पंख्याने वारा घालत होता.
ते झाशीला पोहोचले तेव्हा लँग यांना पन्नास घोडेस्वारांनी एका पालखीत बसवून रानी महालपर्यंत आणलं. इथे राणीने एक शामियाना तयार ठेवला होता.
राणी लक्ष्मीबाई या शामियानाच्या एका कोपऱ्यात पडद्यामागे बसल्या होत्या. तेवढ्यात अचानक त्यांचा दत्तकपुत्र दामोदरने पडदा बाजूला केला.
लँग यांची नजर राणीकडे गेली. या घटनेनंतर रेनर जेरॉस्च यांनी एक पुस्तक लिहिलं. 'द रानी ऑफ झाँसी, रेबेल अगेन्स्ट विल'.
या पुस्तकात रेनर जेरॉस्च यांनी जॉन लँग यांचं वक्तव्य दिलं होतं. ते म्हणतात, ''राणी एक मध्यम उंचीची पण तगडी महिला होती. तरुणपणी त्यांचा चेहरा खूपच सुंदर असावा पण याही वयात त्यांच्या चेहऱ्याचं आकर्षक रूप कमी झालं नव्हतं. मला एक गोष्ट थोडी आवडली नाही ती म्हणजे त्यांचा जरा जास्तच गोल चेहरा. हां, त्यांचे डोळे खूप सुंदर होते आणि नाकही खूपच नाजूक होतं. त्या फार गोऱ्या नव्हत्या. सोन्याचे कानातले सोडले तर त्यांनी एकही दागिना घातला नव्हता. त्यांनी पांढरी शुभ्र मलमलची साडी नेसली होती. त्यातून त्यांची देहाकृती स्पष्ट आणि रेखीव दिसत होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाला मारक ठरेल अशी एकच गोष्ट होती.. त्यांचा फाटलेला आवाज.'
दत्तक घेतलेल्या दामोदरला वारस म्हणून मान्यता मिळण्यासाठी राणीने मोठा संघर्ष केला. पुढे 1857 मध्ये ब्रिटीशांविरोधात मोठा उठाव झाला. यात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
रणांगणावर त्यांनी स्वतः सैन्याचं नेतृत्त्व केलं. यावेळी दामोदरला पाठीवर बांधून त्या युद्धभूमीवर तलवारीसह उतरल्या आणि ब्रिटीश सैन्याशी लढता-लढताच त्यांचा मृत्यू झाला.
झाशीच्या राणीला पाहाणारा ऑस्ट्रेलियन वकील
जॉन लँग यांनाही राणी लक्ष्मीबाईंना जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. पण रणांगणात नव्हे तर त्यांच्या हवेलीमध्ये.
राणी लक्ष्मीबाई यांनी जेव्हा दामोदरला दत्तक घेतलं तेव्हा इंग्रजांनी ते बेकायदेशीर घोषित केलं. त्यामुळे राणी लक्ष्मीबाईंना त्यांचा झाशीचा महाल सोडावा लागला.
त्यांनी 'रानी महल' नावाच्या एका तिमजली हवेलीमध्ये आश्रय घेतला होता.
कायदेशीर लढाईसाठी राणीने वकील जॉन लँग यांची मदत घेतली. त्यांनी नुकताच ब्रिटिश सरकारच्या विरोधातला एक खटला जिंकला होता.
लँग यांचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता आणि ते मेरठमध्ये The Moffusilite नावाचं एक वर्तमानपत्र चालवत होते.
लँग यांना फारसी आणि हिंदुस्तानी अशा दोन्ही भाषा चांगल्या येत होत्या. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर नाराज होते कारण लँग नेहमीच त्यांना कायदेशीररीत्या घेरण्याचा प्रयत्न करत होते.
लँग जेव्हा पहिल्यांदा झाशीला आले तेव्हा राणीने त्यांना आणण्यासाठी एक घोड्यांचा रथ आग्र्याला पाठवला.
त्यांना झाशीला आणण्यासाठी राणीने आपले दिवाण आणि एका जवळच्या अनुयायाला पाठवलं होतं.
या अनुयायाच्या हातात बर्फानं भरलेली एक बादली होती. त्यात पाणी, बियर आणि निवडक वाइनच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. पूर्ण रस्त्यात एक नोकर त्यांना पंख्याने वारा घालत होता.
ते झाशीला पोहोचले तेव्हा लँग यांना पन्नास घोडेस्वारांनी एका पालखीत बसवून रानी महालपर्यंत आणलं. इथे राणीने एक शामियाना तयार ठेवला होता.
राणी लक्ष्मीबाई या शामियानाच्या एका कोपऱ्यात पडद्यामागे बसल्या होत्या. तेवढ्यात अचानक त्यांचा दत्तकपुत्र दामोदरने पडदा बाजूला केला.
लँग यांची नजर राणीकडे गेली. या घटनेनंतर रेनर जेरॉस्च यांनी एक पुस्तक लिहिलं. 'द रानी ऑफ झाँसी, रेबेल अगेन्स्ट विल'.
या पुस्तकात रेनर जेरॉस्च यांनी जॉन लँग यांचं वक्तव्य दिलं होतं. ते म्हणतात, ''राणी एक मध्यम उंचीची पण तगडी महिला होती. तरुणपणी त्यांचा चेहरा खूपच सुंदर असावा पण याही वयात त्यांच्या चेहऱ्याचं आकर्षक रूप कमी झालं नव्हतं. मला एक गोष्ट थोडी आवडली नाही ती म्हणजे त्यांचा जरा जास्तच गोल चेहरा. हां, त्यांचे डोळे खूप सुंदर होते आणि नाकही खूपच नाजूक होतं. त्या फार गोऱ्या नव्हत्या. सोन्याचे कानातले सोडले तर त्यांनी एकही दागिना घातला नव्हता. त्यांनी पांढरी शुभ्र मलमलची साडी नेसली होती. त्यातून त्यांची देहाकृती स्पष्ट आणि रेखीव दिसत होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाला मारक ठरेल अशी एकच गोष्ट होती.. त्यांचा फाटलेला आवाज.''
..अन् युद्ध पेटलं!
खालसा झालेलं संस्थान आपल्या दत्तकपुत्राला मिळावं, यासाठी राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांविरोधात लढाईत उतरल्या.
त्यावेळी नानासाहेब पेशव्यांनी ब्रिटिशांविरोधात आधीच आघाडी उघडली होती. पेशव्यांना मिळणारं पेन्शन ब्रिटिशांनी बंद केल्यानंतर पेशवे लढाईत उतरले होते.
राणी लक्ष्मीबाई आणि पेशव्यांनी एप्रिल 1857मध्ये आजच्या उत्तर प्रदेशात ब्रिटिश सैन्याविरोधात लढाईला सुरुवात केली.
'झाशीची राणी लक्ष्मीबाई' या ग्रंथाच्या लेखिका प्रतिभा रानडे यांच्या मते: "नानासाहेब आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या मागण्या त्यांच्या दृष्टिकोनातून तो त्यांचा हक्कच होता. इंग्रजांनी तो अन्यायाने हिसकावून घेतलेला होता. आपला हक्क परत मिळवण्यासाठी त्यांनी युद्धात भाग घेतला होता. त्यांच्या दृष्टिकोनातून स्वतःचे राज्य हेच राष्ट्रीयत्व होते. 'राष्ट्रीयता' या शब्दाचा आज जो अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे, त्याची जाणीव त्याकाळी जागृतच झालेली नव्हती. दिल्लीच्या तख्तावर सत्ताधीश कुणीही असला तरी प्रत्येक राजा-महाराजा, नवाब आपापल्या मुलुखात स्वतंत्रच असे. तेच त्यांचे राष्ट्रीयत्व होते."
रानडे यांच्या मताप्रमाणेच अनेक इतिहास अभ्यासकांनी आजच्या 'राष्ट्र' या संकल्पनेची तत्कालीन परिस्थितीशी तुलना करणं चूक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
..आणि तळपती तलवार थंडावली
इंग्रजांचा वेढा फोडून झाशीच्या राणीने पेशव्यांकडे काल्पी नावाच्या गावाकडे कूच केलं. झाशी शहराला उद्ध्वस्त केल्यावर इंग्रजांनी आपला मोर्चा काल्पीकडे वळवला. पण तिथंही लक्ष्मीबाई आणि पेशव्यांना पराभव स्वीकारावा लागला.
अखेर त्यांच्याकडे ग्वाल्हेरला जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. पेशवे आणि लक्ष्मीबाईंनी ग्वाल्हेर ताब्यात घेतलं.
काल्पीपाठोपाठ ब्रिटिश फौजा ग्वाल्हेरच्या दिशेने येऊ लागल्या आणि समोरासमोरचं युद्ध आता अटळ झालं.
17 जून 1858 रोजी इंग्रज स्वारांच्या तलवारीच्या लखलखत्या पात्यामुळं राणीचा मृत्यू झाला. त्या जागी आता स्मारक उभारण्यात आलं आहे.