Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ram Navami 2024: भारतातील प्रमुख राम मंदिर, दर्शन घेण्यासाठी जा अवश्य

Webdunia
बुधवार, 17 एप्रिल 2024 (06:04 IST)
चैत्र नवरात्रीचे पवित्र पर्व 9 एप्रिल पासून सुरु झाले आहेत. नऊ दिवसांच्या या पर्वामध्ये शेवटच्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. रामनवमी या वर्षी 17 एप्रिल 2024 ला साजरी केली जात आहे. या दिवशी अयोध्याचे राजा दशरथ यांच्या घरी श्रीरामांचा जन्म झाला होता. अयोध्या श्रीरामांची जन्म भूमी आहे. जिथे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर श्रीराम मंदिराची स्थापन झाली. या शिवाय 14 वर्षांच्या वनवासादरम्यान त्यांनी अनेक ठिकणी वास्तव्य केले तसेच समुद्र मार्गाने लंकेला पोहचले. जिथे त्यांनी लंकाधिपती रावणाचा वध केला. देशामध्ये अनेक प्राचीन आणि भव्य राममंदिर आहे जिथे तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात. 
 
काळाराम मंदिर 
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये भगवान श्रीरामांचे मंदिर आहे. ज्याचे नाव काळाराम मंदिर आहे. वनवास दरम्यान भगवान श्रीराम, माता सीता आणि बंधू लक्ष्मण सोबत पंचवटी मध्ये थांबले होते. नंतर सरदार रंगारू ओढेकर यांनी या स्थानावर मंदिराचे निर्माण केले. या बाबतीत एक आख्यायिका प्रचलित आहे. सरदार रंगारूला स्वप्न आले की, गोदावरी नदी मध्ये श्रीरामांची काळ्या रंगाची मूर्ती आहे. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी ती मूर्ती काढून त्याची स्थापना केली. 
 
राम जन्मभूमि मंदिर 
उत्तर प्रदेश मधील अयोध्या मध्ये श्रीरामांचा जन्म झाला होता. इथे भव्य मंदिर निर्माण केले गेले तसेच यावर्षी त्याची प्राणप्रतिष्ठा देखील झाली. श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी देश विदेशातून लोक येत आहेत. इथे श्रीराम बालअवस्थामध्ये आहे. तसेच या श्रीराम नवमीच्या पर्वावर अयोध्येला जाऊन दर्शन घेऊ शकतात. 
 
राजा राम मंदिर
संपूर्ण भारत वर्षात एकमात्र स्थान आहे. जिथे प्रभू श्रीराम यांची राजारामच्या रूपात पूजा केली जाते. मध्य प्रदेशच्या ओरछा जिल्ह्यात त्यांचे महालसारखे मंदिर आहे. इथे वर्षभर भक्तांची गर्दी असते. रोज या मंदिरामध्ये गार्ड ऑफ ऑनर देऊन भगवान श्रीराम यान शस्त्र सलामी दिली जाते. 
 
रघुनाथ मंदिर
उत्तर भारत म्हणजे जम्मू कश्मीरमध्ये प्रभु श्रीराम यांचे प्रसिद्ध रघुनाथ मंदिर आहे. वैष्णो देवी जाणारे श्रद्धालु रघुनाथ मंदिर येथे जाणे पसंद करतात. या मंदिरात भगवान राम, माता सीता आणि बंधू लक्ष्मण सोबत विराजित आहे. इथे रामायण आणि महाभारत यांमधील पात्रांची छटा पाहावयास मिळते. 
 
रामास्वामी मंदिर
दक्षिण भारत मध्ये प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर आहे. तमिलनाडुचे रामास्वामी मंदिरमध्ये भगवान राम यांची पूजा होते. अनेक मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामांसोबत माता सीता आणि बंधू लक्ष्मण असतात. पण रामास्वामी देशाचे एकमात्र मंदिर आहे जिथे श्री राम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न विराजित आहे.या मंदिरावर असलेले नक्षीकाम महाकाव्य रामायणामध्ये घडलेल्या घटनांचे दर्शन घडवते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रियांका चोप्राच्या 'पानी'चा टीझर लाँच

होंबळे फिल्म्सचा 'बघीरा' चित्रपटगृहांमध्ये या दिवशी खळबळ माजवणार

Ayushmann Khurrana :आयुष्मान अभिनय आणि गायन, कविता लिहिण्याची चांगली आवड ठेवणारा अभिनेता

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले

सर्व पहा

नवीन

बायको हॉस्पिटलमध्ये

अभिनेता सलमान खानच्या ताफ्यात बाईकस्वार शिरला,गुन्हा दाखल

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

आग्रा : ताजमहाल जवळील प्रेक्षणीय 3 ठिकाणे

पुढील लेख
Show comments