आमिर खान मागील काही काळापासून लोकांची नारजगीला सामोरा जात आहे. काही दिवसांपूर्वी आमिरची मूव्ही 'लाल सिंह चड्ढा' याचा विरोध झाला होता. आता त्या एका जाहिरातीत दिसत आहे ज्यामुळे ते पुन्हा ट्रोल होत आहे. यात आमिर खान आणि कियारा आडवाणी एका बॅकेची जाहिरात करताना दिसत आहे. या जाहिरातीत हिंदू परंपरेचा अपमान होत असल्याचा लोकांचा आरोप आहे. आता या वादात फिल्ममेकर विवेक अग्निहोत्रीने देखील उडी घेतली आहे. विवेकने आमिरवर निशाणा साधत म्हटले की या प्रकारे बकवास करतात आणि मग म्हणतात की हिंदू ट्रोल करतात.
'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने आमिर खान आणि कियारा अडवाणीच्या जाहिरातीवर टीका केली आहे. सोबतच हा ब्रँड सामाजिक कार्याच्या नावाखाली मूर्खपणाच्या गोष्टी दाखवत असल्याचे म्हणाले. आता हे पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.
असे काय आहे या जाहिरातीत
या जाहिरातीत आमिर-कियारा नवविवाहित जोडप्याच्या भूमिकेत दिसत असून आमिर म्हणतो, विदाईमध्ये वधू रडली नाही अशी ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये वर वधूच्या पद्धतीने आपल्या सासरी पहिले पाऊल ठेवतो म्हणजे गृहप्रवेश करतो. तर सर्व आमिरचे थाटात स्वागत करतात.
हा व्हिडिओ शेअर करत विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, सामाजिक आणि धार्मिक परंपरा बदलण्यासाठी बँका कधीपासून जबाबदार ठरल्या हे समजले नाही. मला वाटते की एयू बँक इंडियाने भ्रष्ट बँकिंग प्रणाली बदलून सक्रियपणे काम केले पाहिजे. ते असा मूर्खपणा करतात आणि मग म्हणतात की हिंदू ट्रोल करतात.
ही जाहिरात बघितल्यानंतर सोशल मीडियावर बँकेच्या विरोधात बॉयकॉट हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सोबतच अनेक जण आपले खाते बँकेतून बंद केल्याची चर्चा असली तरी या संपूर्ण प्रकरणावर बँक, आमिर खान किंवा कियारा अडवाणीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.