Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Laughter Day 2025 जागतिक हास्य दिन, हसण्याचे आश्चर्यकारक फायदे

World Laughter Day 2025 date
, शनिवार, 3 मे 2025 (17:38 IST)
जागतिक विनोद दिन (World Laughter Day) हा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. २०२५ साली तो ४ मे रोजी आहे.
 
हा दिवस का साजरा केला जातो?
जागतिक विनोद दिन १९९८ साली डॉ. मदन कटरिया, "लाफ्टर योगा मूव्हमेंट" चे संस्थापक, यांनी सुरू केला.

यामागील उद्देश 
जगभरात शांती आणि सकारात्मकता पसरवणे असा आहे. 
हसण्याच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी जागरूकता वाढवणून 
विविध देश, भाषा व संस्कृतीमधील लोकांना हसवण्याच्या माध्यमातून एकत्र आणणे हा देखील याचा उद्देश आहे.
 
हसण्याचे फायदे
हसण्यामुळे कॉर्टिसोल (तणाव संप्रेरक) पातळी कमी होते आणि मूड सुधारतो.
हसणे हृदय आणि फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. खोल हसण्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हास्य शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय करते, ज्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
एंडोर्फिन हे नैसर्गिक वेदना कमी करणारे हार्मोन्स आहेत, हसण्यामुळे एंडोर्फिन बाहेर पडतात जे वेदनांपासून आराम देतात.
हसण्यामुळे ताण कमी होतो ज्यामुळे चांगली झोप येते.
हसणे तणाव कमी करतो, मूड सुधारतो, नैराश्यावर सकारात्मक परिणाम होतो.
याने इम्युन सिस्टम बळकट होते.
रक्तदाब नियंत्रित राहतं.
वेदना सहन करण्याची ताकद वाढते.
लोकांशी जवळीक वाढते, नातेसंबंध सुधारतात.
मेंदूची कार्यक्षमता वाढते. अधिक उत्साही व क्रिएटिव्ह वाटतं.
दिवसभर उर्जायुक्त वाटते. हसणे हे नैसर्गिक ऊर्जा वर्धक आहे
ALSO READ: 5 benefits of laughing हे आहे हसण्याचे 5 फायदे ...
हसण्यासाठी काय करावे?
लाफ्टर योगा क्लासेस मध्ये सहभागी व्हा.
हसवणारे चित्रपट, व्हिडिओ किंवा कॉमेडी शो बघा.
मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा, विनोद शेअर करा.
आरश्यासमोर उभे राहून मुद्दाम हसा.
दररोज कमीत कमी 10 मिनिटं हसण्याचा संकल्प करा.
पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

India-Pakistan : पाकिस्तानला मोठा धक्का, भारताने सर्व प्रकारच्या पोस्टल आणि पार्सल सेवांवर बंदी घातली