Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय आम्हाला मान्य नाही - मनोज जरांगे

Webdunia
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (21:22 IST)
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेले आंदोलन शमवण्यासाठी न्या. शिंदे समितीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. मात्र, उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारचा निर्णय अमान्य असल्याचे म्हटले आहे. सरकार ने घेतलेले आजचा एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही आणि वाटू देणार नाहीत, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
 
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने पावले न उचलल्यास उद्यापासून पाणी घेणेही बंद करू, पुढील परिणामाला सरकार जबाबदार असेल असेही त्यांनी म्हटले. बीडमधील हिंसाचार प्रकरणी निर्दोष मराठा युवकांना अटक करण्यात आली असून ही दडपशाही बंद करावी असा इशाराही जरांगे यांनी दिला.
 
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळावरून माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी म्हटले की, सकाळी सरकारला सांगितले होते की सरसकट निर्णय घ्यावा. ज्यांच्याकडे नोंदी आहे, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र न देता सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली.
 
राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करून शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करावा. उद्यापर्यत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्या पासून पाणी घेणे बंद करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

'मनमोहन सिंग यांना इशारा देण्यात आला होता, तरीही PMLA तुरुंगात पाठवण्यासाठी एक शस्त्र बनले', शरद पवारांचा मोठा खुलासा

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments