Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Dry Hair: रुक्ष केस देखील रेशमी आणि मुलायम होतील, फक्त या टिप्स फॉलो करा

hair
, शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (14:37 IST)
केस अनेकदा कोरडे आणि निर्जीव होतात. कारण रासायनिक उत्पादने आणि शैम्पू आहेत. त्याचबरोबर हिवाळा सुरू झाल्यावर ही समस्या वाढते.कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा हेअर मास्क केसांमध्ये लावा. अनेकदा मुली केसांना सिल्की आणि मऊ करण्यासाठी पार्लरची मदत घेतात. असं करणं महागडं असत. घरच्या घरीही केसांना मऊ आणि सिल्की बनवू शकता. हे हेअर मास्कचा वापर करा आणि केसांना सिल्की, मऊ आणि सुंदर बनवा. चला तर मग जाणून घ्या .
 
 दही दोन चमचे, मेयोनेझ एक वाटी, मध एक चमचा, खोबरेल तेल दोन चमचे. हे सर्व घटक केसांच्या लांबीनुसार घेऊ शकता. सर्व घटक चांगले मिसळा. ही पेस्ट केसांच्या मुळांशिवाय सर्व केसांवर लावा. केसांच्या तळाशी ते सर्व प्रकारे लावा. साधारण अर्ध्या तासानंतर केस धुवा. केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा. आठवड्यातून दोनदा हा हेअर मास्क लावल्याने केसांमध्ये फरक पाहू शकता.
 
हेअर मास्कचे फायदे-
हेअर मास्क लावल्याने केस रेशमी होतात. त्यामुळे ते कमी तुटतात. केसांसाठी दही खूप फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, खोबरेल तेल केस मजबूत करते. हेअर मास्क लावल्याने केसांना मॉइश्चराइज त्यामुळे ते रेशमी आणि मऊ होतात. आणि केस चमकदार दिसू लागतात. 
 
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पतीचा राग शांत करण्यासाठी आणि वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यासाठी या टिप्स अवलंबवा