बऱ्याच वेळा आपलं शरीर अशी काही चिन्हे देतात ज्यांना आपण दुर्लक्षित करतो. जसे की ओठ कोरडे होणं, डोळे पिवळे होणं, या लक्षणांकडे आपण कधी गांभीर्याने लक्ष देत नाही, परंतु त्यांना दुर्लक्षित करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज आम्ही अशा काही लक्षणाबद्दल सांगत आहोत जे आपल्या चेहऱ्यावर दिसल्यावर त्यांना दुर्लक्षित करू नये. हे चिन्हे दिसल्यास त्वरितच डॉक्टरांना दाखवावे. आपल्यासाठी हे लक्षणे सामान्य असू शकतात परंतु हे सामान्य नसतील. चला तर मग जाणून घेऊ या.
1 फाटलेले ओठ -
ओठ फाटणे आणि रुक्ष किंवा कोरडे होणं ही समस्या प्रत्येकाला आहे. या वर उपचार म्हणून आपण साय किंवा मलई किंवा बाजारपेठेतून आणलेले उत्पादनांचा वापर करतो. परंतु ओठाचे फाटणे एखाद्या अडचणीचे चिन्हे असू शकतात.
काय दर्शवितात ओठांचे फाटणे-
फाटलेले ओठ किंवा ओठांना कोरड पडणे हे शरीरात पाण्याची कमतरता आहे दर्शवतात. म्हणजे निर्जलीकरण होणं. म्हणून आपण भरपूर पाणी प्यावं आणि जर जास्त पाणी पिणाऱ्यांसह देखील ही समस्या असल्यास उशीर ना करता त्वरितच डॉक्टरांशी संपर्क करावा.
2 चेहऱ्यावर काळे तीळ होणं-
चेहऱ्यावर काळे आणि गडद रंगाचे मोल्स होणं देखील अनेक प्रकारच्या आजार होणं दर्शवतात. या मुळे शरीराला जास्त हानी होत नाही परंतु आपल्या चेहऱ्यावर जास्त डाग असल्यास एकदा तरी डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मोल्सच्या बदलण्याकडे लक्ष द्या-
आपल्याला कोणत्या परिस्थितीत डॉक्टरांकडे जावं
* जर आपले मोल्स तीक्ष्ण आणि टोकदार असतील तर.
* जर मोल्स मोठे असतील.
* काही आठवड्यापासून बदल झाले असल्यास.
या पैकी काहीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
3 डोळे पिवळे होणं -
डोळे पिवळे होणं किंवा त्वचा पिवळी होणं हे देखील धोक्याची घंटा असते.
जर आपले डोळे पिवळे आहे किंवा चेहऱ्यावर पिवळे पणा आहे तर हे लिव्हरच्या आजारांना सूचित करत. कदाचित कावीळ किंवा लिव्हरशी निगडित आजार असू शकतात. म्हणून आपण ह्यांना दुर्लक्षित करू नका आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
4 पापण्या लोंबकळणे-
पापण्या लोंबकळणे हे वृद्धत्वाची लक्षणे मानले जाते परंतु हे एखाद्या गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. जसे की आपल्याला स्ट्रोक किंवा ट्यूमर सारखे गंभीर आजार असू शकतात. अहवालानुसार पापण्या लोंबकळण्यासह आपल्या आवाजात कंपन होत असल्यास हे अर्धांगवायूचा हावभाव देखील होऊ शकतो.
5 बुबूळ जवळ रिंग होणं -
जर आपल्या बुबुळा भोवती पांढरे रिंग होत असतील तर ह्याचा अर्थ आहे की आपले हृदय निरोगी नाही. पापण्या किंवा बुबुळांच्या जवळ किंवा त्याच्या त्वचेखाली पांढरी चरबी जमा झाल्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे हृदयविकाराच्या गंभीर आजाराचे लक्षणे देखील असू शकतात.