Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फादर्स डे निमित्त वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक मिठाई रेसिपी

Keshar Shrikhand
फादर्स डे निमित्त वडिलांना गोड सरप्राईज देण्यासाठी पारंपरिक मराठी मिठाईपेक्षा उत्तम पर्याय दुसरा असूच शकत नाही. तुमच्या वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक सुगंधी केशर श्रीखंड रेसिपी नक्की ट्राय करू शकता. 
 
सुगंधी केशर श्रीखंड रेसिपी
साहित्य-
१ किलो ताजे घट्ट दही
३/४ कप पिठीसाखर (किंवा आवडीनुसार)
१०-१२ केशर काड्या (२ चमचे कोमट दुधात भिजवलेल्या)
१ चमचा वेलची पूड
बदाम-पिस्त्याचे काप
कृती-
चक्का बनवणे: दही एका सुती (कॉटन) कपड्यात बांधून ३-४ तास टांगून ठेवा, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल आणि घट्ट 'चक्का' तयार होईल.
मिश्रण तयार करणे: या चक्क्यामध्ये पिठीसाखर घालून मिश्रण चमच्याने किंवा पुरणयंत्रातून छान एकजीव (स्मूथ) करून घ्या.
फ्लेव्हर देणे: आता यात केशरमिश्रित दूध, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्सचे काप घालून मिक्स करा.
सर्व्हिंग: श्रीखंड २ तास फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा आणि नंतर खायला द्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लघु कथा : शेवटचा प्रयत्न....आणि शिल्पकाराने एक सुंदर मूर्ती तयार केली