एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटकडून मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करांविरोधात NCBने कारवाई केली आहे. यामध्ये ३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. तसेच एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला देखील एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.
मुंबई विमानतळावर ड्रग्ज सापडल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने कारवाई केली. या कारवाईत बॅगमध्ये ड्रग्जचे चार पाकिटं आढळून आली आहेत. जवळपास ३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.