Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजारांचा फैलाव होवू नये म्हणून काळजी

Care should be taken not to spread the disease Maharashtra News Mumbai News in marathi Webdunia Marathi
, सोमवार, 19 जुलै 2021 (08:29 IST)
मुंबई अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी म्‍हणाले की,मलेरिया, डेंगी आणि लेप्‍टो या आजारांचा फैलाव होवू नये म्‍हणून आवश्‍यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्‍याने सुरु आहेत.मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असल्‍याचे  काकाणी यांनी नमूद केले.
 
जोरदार पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात शिरून समस्या निर्माण झाल्यासंदर्भात  महानगरपालिकेचे उपआयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर म्‍हणाले की,भांडुप संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू कार्यान्‍व‍ित होत आहे. भांडुप येथील मुख्‍य जलसंतुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावत आहे. असे असले तरी उद्या एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्‍याची शक्‍यता आहे. सर्व यंत्रणा कार्यान्‍व‍ित होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती राठोर यांनी दिली.
 
हवामान विभागाचा ऑरेंज इशारा
यावेळी बोलताना हवामान विभागाचे जयंता सरकार म्हणाले की मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट असून ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर