Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गौतम अदानीने मुकेश अंबानींना मागे टाकले

Gautam Adani overtook Mukesh Ambani गौतम अदानीने मुकेश अंबानींना मागे टाकलेNational Marathi News In Webdunia Marathi
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (22:16 IST)
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना झालेल्या मोठ्या तोट्यानंतर जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत मोठे फेरबदल झाले आहेत. यामुळे भारतीय उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या यादीत 10व्या स्थानावर आले आहेत. आज रिलायन्सचे शेअर्स कमी झाल्यानंतर अचानक गौतम अदानींनी मुकेश अंबानींना मागे टाकले.
 
रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी आता जगातील अब्जाधीशांच्या यादीत 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत.  अदानींनी अंबानींच्या पुढे झेप घेतली. अहवालानुसार, शुक्रवारी शेअर्समध्ये झालेल्या उलथापालथीमुळे अंबानींच्या संपत्तीत 2.14 टक्के म्हणजे  $2 बिलियनची घट झाली.

फेसबुकची मूळ कंपनी मेटा शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग आता जगातील अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर पोहोचले आहे.
टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क अजूनही अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्वात लांब विजेचा विक्रम, 'मेगाफ्लॅश'ने केला विश्वविक्रम