Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द बोलण्या प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ता संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल

Maratha community
, सोमवार, 8 सप्टेंबर 2025 (14:36 IST)
हिंदुत्ववादी कार्यकर्ता संगीता वानखेडे यांनी  मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द वापरण्याबद्दल मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या  महिलांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पुण्यातील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आणि संगीता यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे 
संगीता वानखेडे यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड संघटनेचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी फिर्याद दिली आहे. 
संगीता यांनी मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत अपशब्द काढले तसेच मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द काढत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
ALSO READ: आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल
त्यांची पोस्ट व्हायरल झाल्यावर मराठा समाजाच्या महिलांनी यावर आक्षेप घेतला आणि महिलांनी संगीता वानखेडेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत चिखलीतील महिलांनी रविवारी दुपारी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली.
ALSO READ: पुण्यात दौंडमध्ये गणेशोत्सवा दरम्यान तरुणाची विटांनी ठेचून हत्या
तसेच जो पर्यंत संगीता वानखेडेवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी मागणी आंदोलन करणाऱ्या महिलांनी केली. पोलिसांनी या प्रकरणी संगीता वानखेडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अतिवृष्टीचा कहर! हजारो गावे बुडाली