Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

रेमडेसिवीरचा काळाबाजार: चिखलीतील नगरसेविकेच्या मुलाला अटक

रेमडेसिवीरचा काळाबाजार: चिखलीतील नगरसेविकेच्या मुलाला अटक
, मंगळवार, 27 एप्रिल 2021 (15:56 IST)
पिंपरी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेविकेच्या मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली. कोरोना आजारावरील रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा आहे. अनेकांना इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचा जीव जात आहे. त्यातच इंजेक्शनचा काळाबाजार करीत चिखली प्रभाग एकच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केल्याने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.
 
पुणे पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ६ इंजेक्शन जप्त केले आहेत. याप्रकरणी खडकी, अलंकार आणि डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शुभम नवनाथ आरवडे (वय २२) आणि वैभव अंकुश मळेकर (वय २०) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 
 
त्यांच्या ताब्यातून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. वैभव मळेकर हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा आहे. त्या चिखली प्रभागातून निवडून आलेल्या आहेत.
 
डेक्कन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात राहुल सुनील खाडे (वय २२) आणि विजय दिनकर पाटील (वय ३१) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात विष्णु रामराव गोपाळघरे (वय ३४) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
वरील सर्व आरोपींनी रेमडेसिविर इंजेक्शन अवैधरित्या मिळवून ते स्वतःच्या ताब्यात बाळगले होते. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या इंजेक्शनची ते बेकायदेशीररित्या वैध किमतीपेक्षा जास्त किंमतीला विक्री करत होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश - 1 आणि 2 मे रोजी देशातील या दोन राज्यात लॉकडाउन